Quantcast
Channel: Marathi Love Songs – Marathi Unlimited
Viewing all articles
Browse latest Browse all 69

उघड्यावरी माझे आयुष्य सर्व गेले

$
0
0

life and struggle

उघड्यावरी माझे आयुष्य सर्व गेले
आता कशास तुम्ही हे वस्त्र पांघरले ?
तुडवीत मरणवाटा आलो स्वतः स्मशानी
आधीच पेटलो मी देता कशास अग्नी ?
गंगोदके कशाला ? डोळ्यातच खूप पाणी
त्यानेच स्नान घाला , मी ठेविले जपुनी .
संस्कार मर्तिकांचे करता उगाच कशाला ?
माझ्याच कातडीचे मलाच पांघरून घाला .
होतो कधी मी तुमचा म्हणुनी उगाच टाहो
शोधा अजून कोणी , खांदा त्यास द्या हो ….

प्रणव वानखेडे

The post उघड्यावरी माझे आयुष्य सर्व गेले appeared first on Marathi Unlimited.


Viewing all articles
Browse latest Browse all 69

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>