नकोस फिरू मानवा शोधात कल्पतरूच्या,
कर प्रयत्न स्वत: कल्पतरू होण्याचा.
कल्पतरुला शेवटी काय मागशील तू?
शाप आहे अमरत्व सखा आपला मृत्यू.
ज्याला हवे ते दे, त्याग विचार तो घेण्याचा
कर प्रयत्न तू कल्पतरू होण्याचा.
स्त्री, मुले, माय हा बाप आहे.
का ईवलासाच तुझा व्याप आहे?
स्ख्ख्या जणान सारखाच आदर तू ईतरजणांचा
कर प्रयत्न स्वत:कल्पतरू होण्याचा
निराधारांना आसरा देण्याचे काम कर
स्वत:ची शिदोरी भुकेल्यांना दान कर.
सोड देव-धर्म, कर नवस मानवाचा
कर प्रयत्न स्वत: कल्पतरू होण्याचा
हेतू या जीवनाचा विचार तू स्वत:ला
दुबळ्यांच्या मदतीस लाव प्राण तू पणाला
तरशील खेळलास जर हा खेळ भावनांचा
कर प्रयत्न स्वत: कल्पतरू होण्याचा.
मनोज पेणकर (Manoj Penkar)
The post कविता.. कल्पतरू appeared first on Marathi Unlimited.
