Quantcast
Channel: Marathi Love Songs – Marathi Unlimited
Viewing all articles
Browse latest Browse all 69

ग्रंथ गीत

$
0
0

granth geet

ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती ।
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या राती  ।।धृ ।।
या ग्रंथाच्या तेजामधुनी जन्मा येते क्रांती ।
ग्रंथ शिकविती माणुसकी अन, ग्रंथ शिकविती शांती ।
निराश जीवा धीर देऊनी पुढे घेउनी जाती ।।१।।
पुस्तकातल्या सुंदर गोष्टी, सुंदर सुंदर गाणी ।
पुस्तकातुनी बाल कवींची,भेटत असे फुलराणी ।
गारे वारे, झरे, पाखरे ह्यांचे हे सांगाती ।।२।।
वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञांनाचा ।
ईतिहासाचा, साहित्याचा आणिक विज्ञांनाचा ।
नव्या जगाचे, नव्या युगाचे प्रकाश गाणे गाती।।३।।

कवी- मंगेश पाडगावकर

The post ग्रंथ गीत appeared first on Marathi Unlimited.


Viewing all articles
Browse latest Browse all 69

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>